Irfan Pathan On Ramesh Bidhuri Statement On Danish Ali : लोकसभेत गुरुवारी (२१ सप्टेंबर) रोजी भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी एकामागून एक अनेक आक्षेपार्ह शब्द वापरले. यानंतर बराच गदारोळ झाला. दिल्ली दक्षिण मतदारसंघाचे खासदार बिधुरी यांनी बसपा खासदार दानिश अली यांना अतिरेकी आणि मुल्ला असे शब्द संबोधले. यासोबतच त्यांनी बघून घेऊ, अशी धमकीही दिली. काही वेळातच या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबद्दल खेद व्यक्त करत माफी मागितली, पण याबाबतचा वाद अजूनही थांबत नाहीयेत.
Ramesh Bidhuri : रमेश बिधुरींच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर इरफान पठाण संतापला, हे ट्वीट चर्चेत
सप्टेंबर २३, २०२३