Type Here to Get Search Results !

Date

Fact Check: मंदीमुळे सुरतच्या व्यापाऱ्यांनी रस्त्यावर हिरे फेकले? बातमीमागचे सत्य घ्या जाणून

Gujarat Diamonds News: मंदीमुळे गुजरातमध्ये संतप्त व्यापाऱ्यांनी रस्त्यावर हिरे फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Gujarat Diamonds News Fact Check

गुजरातच्या सुरतमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रस्त्यावर पडलेल्या हिऱ्यांसाठी नागरिकांची तुंबड गर्दी झाली. दरम्यान, २४ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने हिरे बाजारात खळबळ उडाली. मात्र, या बातमीमागील सत्य जाणून हिरे गोळा गोळा करून आणि ते बाजारात विकून चांगले उत्पन्न मिळवणाच्या मानसिकतेने रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांचे दात आंबट झाले आहेत.

Fact Check: मंदीमुळे सुरतच्या व्यापाऱ्यांनी रस्त्यावर हिरे फेकले? बातमीमागचे सत्य घ्या जाणून

हिरे उद्योगातील मंदीमुळे संतप्त व्यापाऱ्यांनी सार्वजनिक सुरतच्या रस्त्यावर हिरे फेकल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर रस्त्यावर पडलेले हिरे शोधण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. हे हिरे विकून चांगले उत्पन्न मिळेल या मानसिकतेने नागरिक हिरे शोधताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर रस्त्यावर फेकण्यात आलेल्या हिऱ्यांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  हे खरे किंवा चांगल्या दर्जाचे सिंथेटिक हिरे नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. ज्या हिऱ्यांसाठी नागरिकांनी रस्त्यावर तुफान गर्दी केली, ते हिरे दागिने किंवा साडीच्या कामावर वापरले जाणारे बनावट हिरे आहेत. परंतु, याबाबत व्हाट्सअपवर चुकीची माहिती पसरवण्यात आल्याने हा प्रकार घडला. दरम्यान, २४ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेने हिरे बाजारात खळबळ उडाली.

Top Story