Small Saving Schemes : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि सुकन्या समृद्धी योजनांसारख्या छोट्या बचत योजनांसंदर्भात आगामी ३० सप्टेंबरला निर्णय अपेक्षित आहे. वास्तविक सरकार तिमाही आधारावर व्याजदरांची समिक्षा करते. त्यामुळे या ३० सप्टेंबरला छोट्या बचत योजनांचे पूर्नरावलोकन केले जाईल. त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल.
पीपीएफचे काय होईल
यंदाच्या वर्षी पीपीएफच्या व्याजदरात कोणताही बदल केला जाणार नाही. पीपीएफवरील व्याजदरात एप्रिलनंतर कोणताही बदल केलेला नाही. सध्याच्या काळात पीपीएफवर गुंतवणूकदारांना ७.१० टक्के व्याजदर दिला जातो. एसएजी इन्फोटेकचे एमडी अमित गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, अर्थमंत्रालय आँक्टोबर ते नोव्हेंबरच्या तिमाहीसाठी पीपीएफ व्याजदर ७.१० टक्के कायम ठेवू शकतात.
प्रत्येक तिमाहीसाठी सुधारित व्याजदरानुसार वर्षाच्या अखेरीस गुंतवणूकदारांच्या खात्यात रक्कम जमा केली जाते. कोणतीही व्यक्ती पीपीएफम्ये एका वर्षात १.५ लाखांपर्यंतची रक्कम जमा करू शकतो. वार्षिक आधारावर ८० सी अंतर्गत कर सवलत दिली जाते. याशिवाय पीपीएफ मच्योरिटीची रक्कमही करमुक्त आहे.
article source link : hd