Asian Games Cricket schedule : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. यानंतर आता टीम इंडिया २४ सप्टेंबरला सेमीफायनल सामना खेळणार आहे. याआधी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात टीम इंडियाला मलेशियाचे आव्हान होते, मात्र दोन्ही संघांमधील सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. मात्र, मानांकनाच्या आधारे भारतीय संघाला उपांत्य फेरीत धडक मारण्यात यश आले. भारताशिवाय श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत.
Asian Games Cricket : भारतासह हे संघ सेमी फायनल खेळणार, सामने कधी सुरू होणार? जाणून घ्या
सप्टेंबर २४, २०२३