Chhatrapati Shivaji Maharaj International Airport : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतररष्ट्रीय विमानतळमंगळवारी ६तासांसाठी पूर्णपणेबंद राहणार आहे. या काळात विमानसेवा पूर्णपणे ठप्प राहणार आहे.
मुंबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतररष्ट्रीय विमानतळ उद्या (१७ ऑक्टोबर) ६ तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. या सहा तासांत मुंबई विमानतळावरून एकाही विमानाचेउड्डाण होणार नाही तसेच बाहेरून येणाऱ्या विमानांचे लँडिंगही होणार नाही.
पावसाळा संपल्यानंतर विमानतळावरील सर्व व्यवस्था सुरळीत सुरू राहण्यासाठी व दुरुस्तीसाठी मुंबई विमानतळ काही तासांसाठी बंद ठेवण्यात येत.त्यानुसार यंदा१७ ऑक्टोबर (मंगळवार) रोजी देखभालीचे काम हाती घेण्यात येणार असून याकरिता त्या दिवशी सकाळी ११ ते सांयकाळी ५ या वेळात विमानतळावरील दोन्ही रन-वे बंद राहणार आहेत. त्यामुळे या कालावधीमध्ये मुंबईतून विमानसेवा ठप्प राहणार आहे .मुंबई विमानतळ हे देशातील दुसऱ्या क्रमाकांचे सर्वात व्यस्त विमानतळ आहे. त्यामुळे तेथील वाहतूक काही तासांसाठी बंद ठेवल्याशिवाय देखभालीचे काम करता येत नाही.
प्रवाशांनामुंबई विमानतळावरून सकाळी १० वाजण्यापूर्वी व संध्याकाळी ५ नंतरच प्रवास करता येणार आहे. मात्र, मधल्या काळात विमानसेवा सहा तासासाठी बंद राहणार असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
विमानतळ प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनानुसार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पावसाळ्यानंतरच्या सर्वसमावेशक धावपट्टी देखभाल योजनेचा एक भाग म्हणून, दोन्ही रनवे RWY०९/२७ आणि RWY १४/३२ हे १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत तात्पुरते नॉन-ऑपरेशनल राहतील.
http://dlvr.it/SxXzcp