बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळावर चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे नाव 'यूटी ६९' असे आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये राज कुंद्राची भूमिका ही स्वत: राजने साकारली आहे.
यूटी ६९' या चित्रपटाच्या २ मिनिटे ५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये राज कुंद्रा जेलमध्ये एण्ट्री करताना दाखवले आहे. तेथे पोलीस अधिकारी त्याच्याकडचे सगळे सामान काढून घेतात. त्यानंतर जेलमध्ये त्याचे काही मित्र होतात. जेलमधील सर्वजण सतत त्याला तू खरच शिल्पा शेट्टीचा नवरा आहेस का? तू तिच्यासोबतच राहातो का? असे अनेक प्रश्न विचारताना दिसत आहे. काही दिवसांनंतर राजला या सगळ्या विचित्र गोष्टींचा कंटाळा येऊ लागतो. आता राजचा जामीन कसा मंजूर झाला हे चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.
राज कुंद्राला अश्लील चित्रपट निर्मिती केल्याच्या आरोपानंतर अटक करण्यात आली होती. त्याला मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये जवळपास ६३ दिवस राहावे लागले होते. या ६३ दिवसात त्याच्यासोबत काय काय झाले, राजला कोणत्या कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला, इतके दिवस जेलमध्ये काय केले या सर्व गोष्टी चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत.
'यूटी ६९' या चित्रपटाचे दिग्दर्शन शहनवाज अलीने केले आहे. तर चित्रपटाचे लेखन स्वत: राज कुंद्राने केले आहे. आता या चित्रपटात शिल्पा शेट्टीची भूमिका कोण साकारणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तसेच इतक कोणते कलाकार दिसणार याबाबतही कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हा चित्रपट ३ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.
http://dlvr.it/SxfBRW