आजकाल सोशल मीडिया हे फार महत्त्वाचे माध्यम ठरते. कलाकार चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी किंवा त्यांच्या खासगी आयुष्याविषयी माहिती देताना सोशल मीडियाचा सरास वापर करतात. कलाकारांचा सोशल मीडियावर सक्रिय राहण्याकडे जास्त कल असतो. त्यासाठी ते सतत रिल्स किंवा पोस्ट शेअर करतात. नुकताच एका अभिनेत्याने सेटवर रील शूट केल्यामुळे दिग्दर्शकाने संताप व्यक्त केला आहे.
हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून चिन्मय उदगीकर आहे. चिन्मयने ‘स्वप्नांच्या पलीकडले’,’नांदा सौख्य भरे’ आणि ‘घाडगे & सून’ या मालिकांमध्ये काम केले आहे. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. त्याचा 'आतुर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या सेटवरील एक किस्सा त्याने नुकताच सांगितला आहे.
प्रीती मल्लापुरकर यांनी याबद्दलचा एक किस्साही सांगितला आहे. “आम्ही एक सीनचे शूटींग करत होतो. त्यावेळी प्रणव रावराणेच्या डोक्यात एक कल्पना आली. तो म्हणाली की ‘आजकाल कच्चा बदाम हे गाणं खूप व्हायरल होतंय, तर त्यावर आपण डान्स करु’. त्याने चिन्मयला ही संकल्पना सांगितली. ते दोघं रील बनवायला गेले. मी ते व्हायरल रीलही बघितलं नव्हतं. पण त्या दोघांना नाचताना बघून मीही त्यांच्यात सहभागी झाले. पण आम्ही ते रील करत असताना मध्येच शिवाजी लोटन पाटील सर आले. त्यांनी आम्हाला ‘तुम्हाला रील बनवायचे पैसे थोडीच दिलेत. अभिनय करायचे पैसे दिले आहेत’ हे सगळं कुणीतरी मोबाईलमध्ये रेकॉर्डही केलं” असे त्या म्हणाल्या.
http://dlvr.it/SxfBfK